गझल
माझा सवाल आहे, तूझा जबाब नाही.
पत्त्यांमधील मी तर, साधा गुलाम नाही.
तू हायवे यशाचा, मी पायवाट साधी.
माझ्या वरील खड्ड्यांचा, तर हिशेब नाही.
आशेवरी जगावे, हे आज थांबवावे.
पण थांबणे जमावे ,आचार तोच नाही.
स्वप्ने कळे मला ना, का पाहतो असे मी.
होणे पुरे न होणे, माझ्या कह्यात नाही.
केली सहजच होती, तारीफ त्या दिसाला,
काहीतरी सुचवणे, माझा विचार नाही...
- मृणाल ये.
#mrunalspoem@
No comments:
Post a Comment