कधीतरी असे घडावे...
माझ्या हृदयातले शब्द तिच्या होटावर असावे
मी कधी न काही बोलता तिला सर्वकाही कळावे
माझ्या काळजातल गणित तिला कधीतरी सोप जावे
कधीतरी तीने हळूच माझ्या कडे पहाव
माझ्या कडे पाहताच तीने हळूच गोड गालात लाजाव
तीने कधीतरी माझ्या शब्दावर रुसावं
मी तिची अलगत समज काळत बसाव
तिने हळूच लाजत माझ्याकडे बघाव
माझ्या नजरेत बघून तिला माझ्या हृदयातल कळाव
मग आम्ही त्या पाहीलेल्या स्वप्नात रमाव
आणि ते स्वप्न कधीतरी खरं घडाव.....
- ✍️ मृणाल
Mrunalspoem/ Instagram
No comments:
Post a Comment