मन पावसाळी मन कुंद कुंद धुंद
मन पावसाळी जाई वनी करवंद
मन पावसाळी मन भिजे चिंब चिंब
मन पावसाळी दाटुनी येई गोड आठवणींचा कदंब
मन पावसाळी मन आतुर आतुर होई
आठवणींना आपल्या उजाळा देण्यात रमून जाई
मन पावसाळी करी आठवणींची साठवण
मन पावसाळी नववधूस येई सख्याची आठवण
मन पावसाळी धुंद करी मातीचा सुगंध
मन पावसाळी लहरत जाई अंतरीचे ऋणानुबंध
मन पावसाळी सुगंधी मातीचा गोडवा
मन पावसाळी मोरपिसापरी भासे पूर्वेचा गारवा
मन पावसाळी मेघ सावळा बोलवितो
गुणगुणता गीत स्पंदनाचे मनामनांत पिसारा फुलवितो
मन पावसाळी पावसात चिंब नहायाचं
डोळ्यातल्या आसवांसव मन भरुन हसायाचं
मृणाल येवतकर
No comments:
Post a Comment