पहिला पाऊस पहिल्या पागोळ्या
थेंबा थेंबाच्या सुंदर रांगोळ्यानक्षी नक्षीमधून उमटल्या
मनातल्या चारोळ्या. ....
पहिला पाऊस पहिल्या पागोळ्या
थेंबा थेंबाच्या सुंदर रांगोळ्याप्राणाहून प्रिय आम्हा देशाचे संविधान,
हीच तर आहे मानवी हक्काची तलवार.
गावाकडच्या माणसांची
नाळ मातीशी तुटत नाही,
शहरातल्या मातीला
गंध आपुलकीचा वाटत नाही...
कानी पडत नाही पक्ष्यांचा किलबिलाट
दिसेनाशी होई शेतामध्ये जाणारी पायवाट,
कोंबड्यांच्या बागेने तांबडं फुटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..
बंद बंद असती फ्लॅटची दारं
मिळेनासं होई उनाडं वारं,
मायेचे धुकं इथं दाटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..
ना चुलीवरची भाकर
ना जीभेवर साखर,
एकाच्या दु:खाने दुसऱ्याचे काळीज फाटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..
शहरात काळजाला पडतात चरा
शहरापेक्षा गड्या आपुला गाव बरा
माणूसकीचा झरा कधी आटत नाही
गावाकडच्या माणसांची नाळ मातीशी तुटत नाही..!
डोळ्यात तर झरा नसतो पण
डोळ्यात पाणी येतं कुठून
कधी आनंदाश्रू तर कधी दुखः
अश्रूने काळीज जातं फाटून
निसर्गाची देण आहे ओल्या
जखमाने मन येतं दाटून
कंठ दाटला की झुळ झुळ झरा
वाहतो डोळे मिटून
निसर्गाची कमाल आहे अश्रूंचा
झरा वाहतो कुठून
- मृणाल ये.
Mrunalspoem ✍️,,
स्वप्नांना नसते लांबी रूंदी
स्वप्नांना असते उंची