Search This Blog

Tuesday, August 16, 2022

संकटाना शेवटी सांगून झाले..!

 संकटांना शेवटी सांगून झाले

फार तूझे लाड ते पाहून झाले.


जोखण्याची खूप आहे सवय तूला

काय तूझे अजुन ना जोखून झाले ?


पाहणे आहे किती दुष्काळ आणिक

कोरडे ओले खुपच पाहून झाले.


काय सांगू काय झाले आणि का मग ?

जे जसे झाले तसे सांगून झाले.


चार गोष्टी सांग आता तू मला अन्

बोल माझे फार त्या सांगून झाले.


                        - मृणाल येवतकर.

No comments: