दरवर्षी पाऊस आला की
आमचं घर पडायच,
होत होती मग फार तारांबळ
मग सगळ्यांनीच रडायचं...
त्या वर्षी हो आमचं
घर पडलं होतं पावसानं,
चार पोरीच्या पाठीवर
मला मागीतलं होतं नवसानं.. (Mrunalspoem.blogspot.com)
चिल्ल्यापिलांना घेत कुशीत
मायबाप खायची खस्ता,
घर बांधण्या शिवाय
नव्हता हो कोणताही रस्ता...
या वर्षी बांधायचं घर म्हणून
माय पैसा नी पैसा साठवायची,
नाहीच जमलं बजेट म्हणून
पडलेलं घर च सावरायची....
फुटक्या फुटक्या टीनाच
नी होतं घर मातीचं,
मोठं घर बांधण्याचं
स्वप्न होत हो चांदण्या रात्रीच..!!
- ✍️ मृणाल
(mrunalspoem/ Instagram)
No comments:
Post a Comment