Search This Blog

Sunday, September 6, 2020

नातं मैत्रीचं

 किती अनमोल नातं असतं  ना

 पाऊस आणि छत्रीचं ,

 Same तसच असावं

 तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं..!


 किती कोमल नात असतं ना

 फुलांचं आणि फुलपाखरांचं,

 Same तसच असावं

 तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं..!


 किती प्रेमळ बंधन असतं ना

 श्रावणाशी सरीचं ,आणि गायीशी वासराचं,

 Same तसच असावं

 तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं..!


 किती विशाल नातं असत ना

 आकाशाची पाखरांचं, आणि सागरांशी माशांचं,

 Same तसच असावं

 तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं..!

                    -मृणाल येवतकर

                     9511673358


Friday, September 4, 2020

मन पावसाळी

 

मन पावसाळी मन कुंद कुंद धुंद


मन पावसाळी जाई वनी करवंद

मन पावसाळी मन भिजे चिंब चिंब


मन पावसाळी दाटुनी येई गोड आठवणींचा कदंब

मन पावसाळी मन आतुर आतुर होई


आठवणींना आपल्या उजाळा देण्यात रमून जाई

मन पावसाळी करी आठवणींची साठवण


मन पावसाळी नववधूस येई सख्याची आठवण

मन पावसाळी धुंद करी मातीचा सुगंध


मन पावसाळी लहरत जाई अंतरीचे ऋणानुबंध

मन पावसाळी सुगंधी मातीचा गोडवा


मन पावसाळी मोरपिसापरी भासे पूर्वेचा गारवा

मन पावसाळी मेघ सावळा बोलवितो


गुणगुणता गीत स्पंदनाचे मनामनांत पिसारा फुलवितो

मन पावसाळी पावसात चिंब नहायाचं


डोळ्यातल्या आसवांसव मन भरुन हसायाचं

                           मृणाल येवतकर


तू

 तू

इतकी सुंदर का दिसतेस तू?
माझ्या मनात का ठसतेस तू?

विचारता मी टाळे उत्तर?
आणि खळाळून का हसतेस तू?

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसतेस तू?

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसतेस तू?

पिल्लू सर्वत्र का भासतेस तू?
मला माहित आहे खूप प्रेम करतेस तू .....
                              मृणाल येवतकर


जाऊ नकोस इतक्यात साथ सोडून

 

जाऊ नकोस इतक्यात सात सोडून सखे तू
तुझ्यात फार गुंतवून गेलो मी ,
कशातही उरून नाही राहिलो मी.
जाऊ नकोस इतक्यात सात सोडून सखे तू,
अधुरा राहीन मी ,जर गेलीस जीवनातून माझ्या तू ...

असू नकोस तू अबोल अशी ,
येऊन जा एकदा माझ्या मनाशी,
नजरेत माझ्या नजर मिळव एकदा ,
दिसतील तुझ्याच प्रतिमा अनेकदा..

प्रत्येक वेळी स्वप्नात येते तू अशी,
जणू एक स्थान करून जाते हृदयाशी...

तुझे स्मित हास्य देऊन जाते एक आशा जगण्याची ,
त्यात आता नाही उरली भीती मरण्याची..
नको घेउ आता परीक्षा माझ्या प्रेमाची
देऊन जाईल आठवण ती आपल्या निरंतर नात्याची ..

आता फक्त तू तिथं मी ...अन मी तिथं तू
मिळून जगू आयुष्य दोघे
नको "मी" .....अन नको तो.... "तू".
आता फक्त "आपण" अन आपणच दोघे ..........
                                       
                                     मृणाल  येवतकर 



जर करायचा असेल कोरोना वर मात..

 जर करायचा असेल कोरोना मात,

तर भावनो राहा  जरा घराच्या आत

शासनाला देऊया थोडा मदतीचा हात ,

करूया आता या कोरोना चा घात 

धुवुया स्वच्छ स्वच्छ हात

लावूया कोरोना विषाणू ची वाट.

बांधुया तोंडाला रुमाल अथवा मास्क,

सरकार न आखली लॉकडाऊन योजना ही  खास.

लोका मध्ये ठेवूया 3 फुटाच अंतर,

घालू आता या विषाणू वर  हंटर

डॉक्टर, पोलिसांची बघा किती कमाल हाय,

रगताच पाणी करून अपल्या साठी च झटताय.

तुमच्या कार्याला माझा सलाम हाय 

सलाम हाय 

                       -मृणाल येवतकर

,

चिनी कोरोना

 चिनी कोरोना हो हळूच देशात शिरला,
शहराबरोबरच तो गावागावात फिरला.

बघता बघता त्याने देशभर विणले जाळे,
साऱ्या आस्थापनांना लावावे लागले टाळे.

 मंदिर - मंदिरही करावे लागले बंद,
हरपला सारा विद्येच्या मंदीरातील आनंद.

हरवले राष्ट्रगीताचे ते सूर आणि पाढ्यांची ती आवर्तने,
विद्यार्थ्यांविना सारे वर्ग झाले सुने-सुने.

बोलक्या भिंती रुसल्या, मुका झाला फळा,
हसत्या खेळत्या शाळेला आली अवकळा.

सर्वत्र निरव शांतता,मैदाने पडली ओस,
दंगा मस्ती संपली,संपला सारा जोश.

विद्यार्थ्यांविना शाळा जणू आत्म्याविना शरीर,
कधी सुरू होईल हे विद्येचे मंदिर.

गुरू -शिष्यांचे नाते जणू आई आणि मुले,
गुरुविना विद्यार्थी जणू कोमेजलेली फुले.

हे निसर्गराजा, दूर कर हे संकट,करतो तुला वंदन,
गुरू-शिष्य मिळून पुन्हा फुलवू शाळेचे नंदनवन.. 
                            मृणाल येवतकर  
                            मो.9511673358
              
                 
         

गरीब शेतकऱ्याची व्यथा

 हे व्यवहाराचे गाठोडे नाही पेलवत गरिबाले,
भावनांना मारून मोठे कष्ट सोसवत जाचाले.

राबतो एका भाकरीसाठी कोरडं त्या जीवाले,
हाल हाल सोसण्या साठी च का जन्म लाभले.

सुशांत च्या केसचे देशभर धिंडोरे,
शेतकरी नसता तर घ्या लागले असते कटोरे.

 अरे  पिकाले कधी भाव नाही देले,
अन पार्टीत पाहिजे नेत्याले दारूचे पेले.

वरून सरकार घेतायत भ्रष्टाचाराची ढेकरे,
आता तरी घ्या हो आम्हा शेतकऱ्याची दखले.
        -मृणाल येवतकर 
7721096236