प्राणाहून प्रिय आम्हा देशाचे संविधान,
हीच तर आहे मानवी हक्काची तलवार.अन्यायाविरोधात पेटविले त्यांनी संघर्षाचे रान,
आपणास दिले राष्ट्रचे पवित्र असे संविधान.
महिला,मजूर,दिन दुबळ्यांना दिले त्यांचे हक्क,
बाबासाहेबांच्या संविधानातून विश्व घेतोय आदर्श.
समान नागरिक,समान कायदा मिळाला,
लोकप्रतिनिधी निवडण्याचा मताधिकार मिळाला.
प्रज्ञा, करुणा, विद्या आणि जपावी मैत्री,
समता, बंधुता आणि न्यायास द्यावी महती.
आणि अशा थोर महामानवास करून नमन,
आपले राष्ट्रप्रिय संविधान करूया जतन..
@मृणाल येवतकर