स्वप्नांना नसते लांबी रूंदी
स्वप्नांना असते उंचीपूर्तीसाठी हवी स्फूर्ती
अन् जिद्द हवी ती मनची
उपयोगाचा नाही तो
नुसताच पोकळ ध्यास
यश मिळवायचे असेल
तर हवा मग अभ्यास
प्रामाणिकपणे आपण
करत रहायचे प्रयत्न
यश मिळेल नाही मिळेल
नाही करायची खंत
प्रयत्नांत नको धरसोड
हवे नेहमी सातत्य
भान नाही ढळावे
नाही सोडावे तारतम्य
नाही पडावे कधी आहारी
फसवे ते मार्ग भ्रष्ट
आनंदी मनाने सोसावेत
जितकेही पडतील कष्ट
जिवनाच्या ह्या शर्यतीला
नसतो कधी अंत
उघड्या डोळ्यांनी पहावं
अन् मन ठेवावं शांत
- मृणाल येवतकर
#mrunalspoem